गुरु गोविंद यांच्या दोन मुलांनी धर्मासाठी हौतात्म्य पत्करले. त्या दोन बालकांच्या बलिदानाप्रित्यर्थ वीर बाल दिवस होता, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब आणि महाराष्ट्र या दोनच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले होते. गुरुगोविंद यांच्या दोन मुलांना धर्मांतरासाठी जिवंत भिंतीमध्ये गाडले, तरी त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. त्यांचा वीर बाल दिवस होता. हे माहित असतानाही माझ्या दिल्ली दौऱ्यावर काय काय टीका केली. हा हुतात्न्यांचा अपमान आहे. दोन साहब जादे यांचा अवमान आहे, शीख धर्मियांचा अपमान आहे. याची नोंद महाराष्ट्राची जनता नक्की घेईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे कुणी मागितले?
मुख्यमंत्री शिंदे ही वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी दिल्लीला गेले, तेव्हा नागपूरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती. त्यांचा संदर्भ घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. आमचा राजीनामा मागतात. महापुरुषांचा अपमान करत छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी कायम वंदनीय आहेत, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, पण दुर्बीण लावून ध चा मा करण्याचे कारस्थान रचत होते, छत्रपती यांचे वंशज असल्याचे पुरावे कुणी मागितले होते. महाराजांना जनता राजा म्हणून नका असे कोण म्हणाले होते? वंशजांकडे प्रतिज्ञापत्र कुणी मागितला? संतांचा अपमान, वारकरी बांधवांच्या भावना कुणी दुखावल्या? भारत जोडो यात्रेच्या नावाखाली वीर सावरकर यांचा वारंवार अपमान कोण करते?, अशी विचारणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी आम्हालासांगण्याची गरज नाही
आम्ही महापुरुषांचा नेहमी सन्मान केला आहे. मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर लावले, हिंदुहृयद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मुंबईतील विधानभवनात लावण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ त्यांच्या नावाने मते तुम्ही मागितली, आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. शिवसृष्टीसाठी निधी उभा केला आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यांची जयंती साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रतापगडाच्या पायथ्याखाली अतिक्रमण हटवले. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राचा विकास करणार आहोत. लाखो वारकरी वर्षातून एकदा तिथे जातात, तेव्हा त्यांना सोयीसुविधा मिळल्या पाहिजे, हीच आमची भावना आहे. पण त्या संतांचा अपमान केला जात आहे. महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी आम्हाला कुणी सांगण्याची गरज नाही. महिला भगिनींचा सन्मान करणारे हे सरकार आहे. आमच्या बरोबर असलेल्या महिला भगिंनीविषयी काय बोलला होतात?, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community