Eknath Shinde : कुणीतरी म्हणाले की, आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे, रावणालाही अनेक चेहरे होते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचे जनतेने ठरवले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

135
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार

आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आले आहेत. मोदींविरोधात कसे लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील. काल परवा कुणीतरी म्हटले पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे सांगावे. पण अनेक चेहरे कुणाला असतात हे जनतेला माहिती आहे. अनेक चेहरे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि आपण इकडे जय श्रीरामवाले रामभक्त आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे जगात नावलौकीक वाढवत आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबर किंबुहना तिसऱ्या नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज जगभरात आपल्या देशाचे नाव आदराने, सन्मानाने घेतले जाते याचे आपण साक्षीदार आहोत. दुसरीकडे द्वेष, मत्सर, एका माणसाच्या विरोधात एकत्र आले आहेत. बॅनरवर त्या लोकांचे चेहरेही दिसत नाहीत. महाभारतात पांडवांचा विजय झाला होता. कौरव पराभूत झाले होते. परंतु २०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचे जनतेने ठरवले आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा Mumbai-Pune Expressway : शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘या’ वेळेत वाहतूक बंद)

महाराष्ट्रही नरेंद्र मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. विखे पाटलांचे योगदान सर्वश्रूत आहे. सहकार खात्याला पुढे नेण्यासाठी मोदी सरकारमध्ये सहकार मंत्रालय बनवले. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगला बदल घडला पाहिजे यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केले आणि त्याचे प्रमुख अमित शाह यांना केले. सहकार क्षेत्रातील अनेक उद्योग अडचणीत आले तेव्हा १० हजार कोटी मदत करण्याचं काम केंद्र सरकारने केले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.