मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी संभाजी नगर येथील पैठण जाहीर सभा झाली. या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून काम करतात असं त्यांच्या ताई सांगतात. पण एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी टोला लगावला आहे.
मी काम करत राहणार
ताई म्हणतात की अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून काम करतात. पण ताईंना मी माहिती देतो की हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचं काम करतो आमि हे काम मी राज्याच्या विकासासाठी करत राहणार त्यात कुठलाही खंड पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः सरवणकरांनी गोळ्या झाडल्या? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसले)
कुणी निंदा,कुणी वंदा…
अजित दादा आधी टीका करत होते आता ताईसुद्धा सुरू झाल्या आहेत. आता टीका करणं त्यांचं काम आहे आणि राज्याचा विकास करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही काम करुन विरोधकांना उत्तर देणार आहोत. कुणी वंदा,कुणी निंदा टीका करणं हा विरोधकांचा धंदा, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
Join Our WhatsApp Community