50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

141

गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात, आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. हे सर्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे. तसेच यापुढे हे थर वाढत जाणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

(हेही वाचा – जखमी गोविंदांवर मोफत उपचार! शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आदेश)

देशभरात दहीहंडीचा उत्साह कायम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे जोरदार टोलेबाजी केले. व्यासपीठावर येताच गोविंदा जोरात आहे ना… अशी साद त्यांनी समस्त उपस्थित गोविंदाना घातली. ते म्हणाले, गोविंदाना विमा दिला, सरनाईन आणि लोक प्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती, तीही मान्य करण्यात आली. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे, अपघात होऊ नये, याची काळजी घ्या. यासह त्यांनी असेही सांगितले की, प्रो कबड्डी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा स्पर्धा होईल आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार आहे.

टेंभी नाका म्हणजे गोविंदाची पांढरी आहे. आनंद दिघेंनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. आंनद दिघे बोलले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिनीने माझ्याजवळ दिघेसाहेबांची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांची एवढी दूरदृष्टी होती आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या उत्सवात सहभागी झालो हे सर्वसामान्याचं सरकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.