एसटी (ST) कर्मचाऱ्यांची बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ही महत्त्वाची बैठक झाली.
एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या. एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (CM Eknath Shinde)
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ST कर्मचारी संघटनाकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community