शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे राज्य सरकारवर टीका देखील करण्यात येत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौ-यांची देखील जोरदार चर्चा होत आहे.
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्ली दौ-याबाबत मोठे विधान केले आहे. दिल्ली दौरा आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आज़ादी का अमृत महोत्सवाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक बैठक बोलावली आहे. तर रविवारी नीती आयोगाची बैठक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि माझ्या दिल्ली दौ-याचा काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः ‘तर आदेशाला अर्थ काय?’, उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले)
विस्ताराला कोणताही अडथळा नाही
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही अडथळा किंवा अडचण नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच होणार आहे. आम्ही कुठलीही कामं थांबवलेली नाहीत, निर्णय प्रक्रियेत देखील समन्वयाचा कोणताही अभाव नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या नव्या ट्वीटची चर्चा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘असा’ केला उल्लेख)
Join Our WhatsApp Community