मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असून अनेकांच्या भेटी घेत आहेत. गणेशात्सवात देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी देत बाप्पांचे दर्शन घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे गमेश मंडळांना भेटी देण्यात आणि लोकांसोबत फोटो काढण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मी जसा होतो तसाच आहे
फोटो काढायला ज्यांच्या जवळ जावंसं वाटतं त्यांच्याचसोबत लोक फोटो काढायला येतात. पण बाकी लोकांच्या जवळ सर्वसामान्य फोटो काढायला का जात नाहीत हे मला काही माहीत नाही. पण एक भावना आणि प्रेमाने लोक येतात. मुख्यमंत्री व्हायच्या आधी जसा मी होतो तसाच आजही आहे. त्यामुळे आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याच्या भावनेने लोक येतात त्यामुळे त्यांच्यासोबत मी फोटो काढतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
(हेही वाचाः Russian airstrike in Syria: रशियाचे सिरियावर हवाई हल्ले, 120 बंडखोरांचा मृत्यू)
त्यांना माझ्यामुळे पुण्य मिळत आहे
ही सगळी आपली माणसं आहेत. आम्ही अशा ठिकाणीच जातो जिथे कॅमेरा घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे जे टीकाकार आहेत त्यांना लोक उत्तरे देत आहेत. मी फिरायला लागल्यामुळे अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना फिरण्याचे जे पुण्य मिळत आहे ते माझ्यामुळेच मिळत आहे त्यामुळे त्यांनी ते आनंदाने घ्यावे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
Join Our WhatsApp Community