एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

94

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव करत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत एकाही शिवसैनिकाचा बाल बांका होऊ देणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची हिंमत नाही

गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसैनिकाने खूप काही भोगले आहे. शिवसैनिकाचे खच्चीकरण करण्याचा आणि त्याला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोटे दाखल करण्यात आले, मोक्का सारख्या कारवायांना देखील शिवसैनिकाला सामोरे जावे लागले. गेले अडीच वर्ष माझ्याकडे मुख्यमंत्रीपद नव्हतं. पण आता तुमच्या एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे पुढच्या अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची हिंमत कोणात नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

(हेही वाचाः संतोष बांगरच शिवसेना जिल्हाप्रमुख, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक दणका)

वाट्याला कोणी आलं तर सोडत नाही

शिवसैनिक कधीही कोणाच्या वाटेला जात नाही, पण शिवसैनिकाच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही त्यांना सोडत नाही. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी तुमच्यातील एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्याची दुःखं, वेदना मला माहीत आहेत. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.