‘मला आठवतंय, श्रीकांत डॉक्टर झाला, एमबीबीएस झाला, ऑर्थोप्टिक सर्जन झाला. माझ्याकडे एक गोष्ट मागितली, मला हॉस्पिटल करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही. कारण करायला जायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. निवडणुकीमध्ये हॉस्पिटलसह जे काही आहे ते लावायचो. या एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणूक लढवल्या आहेत,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेचा ५७व्या वर्धापन निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदे म्हणाले की, ‘काल ऐकलं, आजही ऐकलं, तेच टोमणे, तेच आरोप, दुसरं काहीच नाही. तिच कॅसेट, तेच रिपीटेशन, त्यांना स्क्रीप्ट रायटर तरी बदलायला सांगा. तेच तेच, पण आम्ही आरोपाला उत्तर कामाने देणार. हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. हेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. शिवसेना वाढवली, रामदास भाई मगाशी म्हणाले, कितीतरी नेत्यांची त्यांनी नाव घेतली. त्या नेत्यांच्या रक्तातून, घामातून शिवसेना मोठी झाली. आज व्यासपीठावर बसलेले नेते आहेत, या नेत्यांमध्ये टपरीवाला, चहावाला, वॉचमॅन, रिक्षावाला कोण भाजीवाला, याच लोकांना तुम्ही हिणवताय. अरे याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. फाटक्या लोकांना घेवून शिवसेना मोठी केली. हे समोर बसलेले आपण जीवाला जीव दिला. कष्ट केले, मेहनत घेतली. स्वतः जीव धोक्यात घातला. घरादारावर तुळशीपत्र सोडलं. कुटुंबाची परवा केली नाही मगाशी म्हणाले कितीतरी खून झाले, या शिवसेनेसाठी. कितीतरी लोकांचा जीव गेला, शिवसेना वाढवण्यासाठी. कितीतरी लोकांनी जेल भोगले, शिवसेना वाढवण्यासाठी. तुम्ही कुठे होता, किती केस झाल्या तुमच्यावर?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
(हेही वाचा – अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद!)
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘हा एकनाथ शिंदे आज शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामध्ये मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण, तुमच्या सगळ्यांची साथ, सोबत यामुळे झालो. मला आठवतंय, श्रीकांत डॉक्टर झाला, एमबीबीएस झाला, ऑर्थोप्टिक सर्जन झाला. माझ्याकडे एक गोष्ट मागितली, मला हॉस्पिटल करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही. कारण करायला जायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. निवडणुकीमध्ये हॉस्पीटलसह जे काही आहे ते लावायचो. या एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणूक लढवल्या आहेत. निवडून आल्यानंतर निवडलेली माणसं आम्ही मातोश्रीत घेऊन जायचो, त्यांचे स्वागत, त्यांनाच पुष्पगुच्छ आणि शाल,द्यायचो. सगळ्या नेतेमंडळींना माहितेय. मिळेल ते काम केलं, कष्ट केलं. वयाच्या २१व्या वर्षी हा एकनाथ शिंदे कर्नाटकाच्या जेलमध्ये ४० दिवस होता. कितीतरी केसेस झाल्या. अनेक वेळा जेल भोगले. तुम्हीही ते केलंय. माझ्या व्यासपिठावर बसलेल्या नेत्यांनीही तेच केलंय. म्हणून शिवसेना मोठी झाली, पुढे गेली.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community