बारामतीमध्ये शनिवार, २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा झाला. त्यावेळी राज्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही मंचावर उपस्थित होते. राज्यात होणाऱ्या या नमो महारोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा, लातूर इथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाच जिह्यांचा मेळावा बारामतीमध्ये होत आहे, असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – Sachin, Dhoni, Rohit in Jamnagar : अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग समारंभासाठी क्रिकेटपटू आले जामनगरमध्ये)
विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा व विविध विकासकामांचे लोकार्पण
🗓️ 02-03-2024📍बारामती https://t.co/qlfdcWMnVF
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2024
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही जनतेला संबोधित करताना आमचं सरकार लोकाभिमुख असल्याचा दावा केला. सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असतांना मुख्यमंत्री थेटच बोलले.
(हेही वाचा – Ajit Pawar : काम करायचे तर एक नंबर, नाहीतर भानगडीतच पडायचे नाही; शरद पवारांच्या उपस्थित अजित पवार असे का म्हणाले?)
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
“नमो रोजगार मेळाव्यात शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेदेखील मंचावर आहेत. त्यामुळे आमचं सरकार लोकाभिमुख आहे. सर्वसामान्यांचं आहे आणि राजकारण विरहीत असल्याचं आणि त्याची प्रचिती नमो रोजगार मेळाव्याच्या मंचावर येत असल्याचं (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच हे सरकार विकासाच्या बाबतीत कोणतंही राजकारण आणू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community