आता एकनाथ शिंदे राज्यभर करणार शक्तीप्रदर्शन

116

शिवसेनेत उभी फूट पडल्यावर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार आले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची पडझड थांबवण्यासाठी लागलीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरु केली. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभर दौरा करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. हा दौरा ३० जुलैपासून सुरु होणार आहे.

कार्यकर्ता मेळावाही होणार 

या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, तसेच इतर लोकोपयोगी कामांचा आढावा घेणार आहेत. असे असले तरी खऱ्या अर्थाने राज्यात शक्तीप्रदर्शन करून जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचे दाखवून देण्यासाठी शिंदे राज्यभर दौरा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा ३० जुलैपासून सुरू होणार आहे. ३०, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट या दिवशी एकनाथ शिंदे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनादेखील स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. याचप्रमाणे विकास कामातील आढावा, कार्यकर्ता मेळावादेखील होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवरून राष्ट्रीय कार्यकारिणी ‘बरखास्त’! उरली फक्त घराणेशाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.