छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही बाब आपल्या सर्वांच्या गौरवाची आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व तमाम महाराष्ट्रासाठी गौरवाची अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे आयोजित (CM Eknath Shinde) ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनी गार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.
(हेही वाचा – आता ISRO उलघडणार ब्लॅक होल्सचे रहस्य)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)
शिवपराक्रमाने पावन झालेल्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वागत केले.
प्रधानमंत्री @narendramodi यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी येथील छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री @mieknathshinde , केंद्रीय… pic.twitter.com/tV0selvPSc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 4, 2023
(हेही वाचा – World Soil Day: जगभरात ‘जागतिक मृदा दिन’ साजरा, जाणून घ्या संवर्धनाचे पर्याय…)
आज संपूर्ण महाराष्ट्रच नाहीतर राष्ट्र शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे. या ऐतिहासिक दिनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे, याचाही तमाम महाराष्ट्राला अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले देशातील महिलांच्या आत्मनिर्भरतेच प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालं आहे. आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. आता आपल्या सामर्थ्याची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community