मुख्यमंत्री शिंदे रिक्षा-टॅक्सी वाल्यांसाठी लवकरच महामंडळ स्थापन करणार

108

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अत्यंत वेगवान घडामोडी घडताना दिसताय. मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशातच रामदास कदम यांनी माध्यमांसमोर शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर आपली व्यथा मांडली. यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. यानुसार, रिक्षावाला, पानपट्टीवाला, वेश्या अशा शब्दात शिवसेना नेत्यांकडून टीका सहन केल्यानंतर याच घटकासाठी मुख्यमंत्री शिंदे योजना राबविणार असल्याची माहिती मिळतेय. यासह लवकरच रिक्षा-टॅक्सी वाल्यांसाठी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – आई आजारी आहे म्हणत राज्यातील ‘या’ 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक!)

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री उदय सामंत, माजी महापौर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी असणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर रिक्षावाला, पानटपरीवाला, वॉचमन अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून या घटकांची प्रगती करण्यासाठी हे महामंडळ आणि कल्याणकारी योजना सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.

(“जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू”, गुलाबराव पाटलांचे राऊतांना चोख प्रत्युत्तर)

असे असणार रिक्षा-चालक कल्याणकारी महामंडळ

  • राज्यात साडे ८ लाख रिक्षा तर १ लाख २० हजार टॅक्सी आहेत
  • परिवहन किंवा कामगार विभागाच्या अंतर्गत महामंडळ स्थापन होणार
  • महिलांना प्रसुतीसाठी मदत केली जाणार
  • चालकांसाठी वेगळे रूग्णालय असणार
  • ६० वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन दिले जाणार

(इतरांना रिक्षावाला, पानवाला म्हणणाऱ्या राऊतांचा ‘मनसे’ने सांगितला इतिहास)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.