शिंदे गटाने बुधवारी मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवन लवकरच ताब्यात घेणार असल्याची चर्चा विरोधक मंडळींकडून सुरू आहे. अशातच आता अमरावतीचे आणि भाजपचे समर्थक आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतली. उद्धव ठाकरे स्वतः त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाच रवी राणा यांनी केला आहे. रवी राणांच्या या दाव्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राणा यांच्या विधनाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
(हेही वाचा – BEST Recruitment 2023: BMC अंतर्गत चालक, वाहक पदांच्या 12,350 जागेवर महाभरती? BEST ने स्पष्टच सांगितले…)
काय म्हणाले रवी राणा
उद्धव ठाकरेंचे नगरसेवक महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसात बसून टक्केवारीचे राजकारण करत होते. शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरूपयोग होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकांचं नगरसेवक पद राहिलेले नाही, असे असतानाही कार्यालयात बसून टक्केवारीचे काम केले जात होते. त्यामुळे ते मोडून काढण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील लावण्यात आल्याने टक्केवारीचा धंदा बंद होईल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
इतकेच नाही तर राणा पुढे असेही म्हणाले, येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले पाहीजे. शिंदे यांच्याकडे शिवसेना भवन येईल आणि ते ताब्यात घेतील. शिवसेना भवन अधिकृत शिंदे गटालाच मिळेल. शिंदेंकडे बहुमत असल्याने सेना भवन शिंदेंना मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनाच शिंदेंना चावी द्यावी लागणार आहे. शिवसेना भवन हे पक्षाच्या नावाने आहे, जेव्हा पक्षाचे बहुमत ज्याकडे असते त्याच्याकडे पक्षाचा ताबा मिळतो. शिंदे यांच्याकडे 80 ते 90 टक्के पक्ष आहे. शिंदेंनी ते सिद्धही केले आहे. 40 आमदार शिंदे गटात आले आहेत. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदेंना शिवसेना भवन मिळण्यात काहीच अडचण नाही, असा दावाही राणा यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community