राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. सोमवारपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर ९ मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिल्लीत पुन्हा एकदा महत्त्वाचे खलबतं होणार आहे. यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. मग यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार आहेत. यावेळी बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत.
रविवारी होणाऱ्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या काही तासांसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असून यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार व्यतिरिक्त सत्तासंघर्ष आणि राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होणार आहे.
(हेही वाचा – मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित बड्या नेत्याचा राजीनामा)
Join Our WhatsApp Community