‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळत, एकनाथ शिंदेंनी ‘अशा’ दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

93

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना या शब्दांत नाराज आमदारांचे नेतृत्व करणारे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला आहे.  त्यामुळे पक्षप्रमुख हा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला की राहून गेला, अशी चर्चा सध्या होत आहे.

असे आहे एकनाथ शिंदे यांचे ट्वीट 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

( हेही वाचा: आता महाराष्ट्रात होणार ‘सेमीकंडक्टर’ची निर्मिती )

वाढदिवसानिमित्त शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला 62 वा वाढदिवस आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला येत आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.