CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला; म्हणाले विधानसभेची हंडी…

79
CM Eknath Shinde : आठ देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मान्यता

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असून, डिजेच्या तालावर गोविंदासह दहीहंडीप्रेमी सुद्धा थिरकताना दिसून येत आहे. मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात टोला लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळाच्या (Tembi Naka Mitra Mandal) वतीने आयोजित करण्यात आलेला दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडी याठिकाणी शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी ‘हा’ टोला लगावला.   (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Ajit Pawar यांच्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच कन्येला शरद पवार गटाकडून उमेदवारी)

एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, विरोधकांनी कतीही आरोप केले, कितीही रडगाणे गायले तरी सुद्धा विधानसभेची हंडी (Vidhasabhechi hadi) महायुतीच फोडणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांनी केला. आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा आदी सह इतर योजना आणल्या आहेत. मात्र यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळे ते सारखे आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंध मुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. मात्र प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले. (CM Eknath Shinde) 

(हेही वाचा – Ajit Pawar यांच्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच कन्येला शरद पवार गटाकडून उमेदवारी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जे काही काम केले त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा भगवा राज येईल असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोणाला वाटलेही नव्हते की ठाण्यातून मुख्यमंत्री होईल. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या कामाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.