CM Eknath Shinde यांचा नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय, मुलाखतीसाठी शिवसैनिकांच्या रांगा!

133

गेल्या काही काळात जुन्या नेत्यांचे पक्षात सुरू असलेले राजकारण आणि अंतर्गत कुरघोड्या, तसेच नवीन नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वापासून लांब ठेवत आपापल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना केवळ पदांचे वाटप करण्याचा आरोप होत असे. त्यामुळे पक्षांतर्गत बदल करण्याची आणि पक्षाचे निष्ठावंत राहून काम करणाऱ्या नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याची मागणी होत होती. (CM Eknath Shinde)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटना अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पक्षाच्या बांधणीसाठी शिवसेनेने दोन शहरातील कार्यकारिणी बरखास्त करत, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुलाखत प्रक्रियेतून तळागळापासून नवीन नेतृत्वाकडे पक्षाची जबाबदारी देण्यासाठी पक्ष नेतृत्वही आग्रही आहे. त्यातूनच गुरुवारी अंबरनाथ येथील रोटरी सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या मुलाखतीसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (CM Eknath Shinde)

अंबरनाथ शहरात शिवसेनेची एकहाती सत्ता असली, तरी गेल्या काही काळात जुन्या नेत्यांचे पक्षात सुरू असलेले राजकारण आणि अंतर्गत कुरघोड्या, तसेच नवीन नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वापासून लांब ठेवत आपापल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना केवळ पदांचे वाटप करण्याचा आरोप होत असे. त्यामुळे पक्षांतर्गत बदल करण्याची आणि पक्षाचे निष्ठावंत राहून काम करणाऱ्या नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याची मागणी होत होती. याप्रश्नी खुद्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष घालत, आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांसाठी पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का? Chandrashekhar Bawankule यांचा सवाल)

अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील जुनी कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहऱ्यांना संधी

त्यानुसार अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील जुनी कार्यकारिणी बरखास्त केली. तसेच स्थानिक नेतृत्वाकडून पुन्हा आपापल्या गटातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा आरोप होऊ नये. यासाठी खासदार शिंदे, नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत अंबरनाथमधील नवीन कार्यकारिणी व महिला आघाडीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी रोटरी सभागृहात गुरुवारी मुलाखतीचे आयोजन केले होते. (CM Eknath Shinde)

मुलाखतीसाठी शिवसैनिकांसोबत महिला कार्यकर्त्यांचीही गर्दी

या मुलाखतीसाठी शिवसैनिकांसोबत महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रथमच मुलाखतीद्वारे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख आदी पदांवर नियुक्ती होणार असल्याने, इच्छुक शिवसैनिक पूर्ण तयारीनिशी आपल्या कार्याचा अहवाल सोबत घेऊन मुलाखतीला समोर गेले. (CM Eknath Shinde)

श्रीकांत शिंदे मुलाखतकाराच्या भूमिकेत

मुलाखतीसाठी तयार करण्यात आलेल्या नऊ बुथमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र व कुणाच्याही दबावात न येता खासदार शिंदे यांच्या उपस्थितीत मुलाखत देता आली. या मुलाखतीनंतर नियुक्त करण्यात आलेली पद स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.