फाशीच्या शिक्षेवरुन विरोधकांच्या ‘त्या’ प्रश्नाला CM Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर

173
फाशीच्या शिक्षेवरुन विरोधकांच्या ‘त्या’ प्रश्नाला CM Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर
फाशीच्या शिक्षेवरुन विरोधकांच्या ‘त्या’ प्रश्नाला CM Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर

रत्नागिरीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला २ महिन्यात फाशीची शिक्षा झाली असं विधान केले होते. या विधानानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) महाविकास आघाडीकडून (MVA) निशाणा साधण्यात येत आहे. महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) काळात कोणत्या आरोपीला फाशी दिली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे असं आव्हान विरोधकांनी केले होते. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट न्यायालयीन पुरावाच सादर करून, विरोधकांची थेट तोंड बंद केली आहेत. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरात (CM Shinde Kolhapur Visit) करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. एका नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा एकादा केला. तसेच विरोधकांना उत्तर देत हे प्रकरण पुण्यातील मावळ मधील असल्याची माहिती दिली. या प्रकरणी शिवाजीनगर एप्रिल २०२४ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतच मुख्यमंत्र्यांनी दाखवली. इतकेच नाही तर मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मी कधीही खोटे बोलत नसल्याचेही ते म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Badlapur School Case : … तर आम्ही कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही; उच्च न्यायालयाने खडसावले)

त्या आरोपीला फाशीचीच मागणी करणार

बदलापूर प्रकरणातील (Badlapur School Case) आरोपीला फाशीच झाली पाहिजे. अशी मागणी सरकार न्यायालयात करणार असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बदलापूरमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र दुसरीकडे विरोधक त्याचे राजकारण करत असून हे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे राज्यातील वातावरण दूषित होईल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.  (CM Eknath Shinde)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.