महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी सकाळी शिवतीर्थावर पार पडलेल्या बंद दारा आड झालेल्या या बैठकीत तब्बल एक तास चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
(हेही वाचा- Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचं पुनरागमन लांबलं, बंगळुरूत २-३ दिवसांचं रिहॅबिलिटेशन)
शिंदे सेनेला बाजूला करण्याचा भाजपचा डाव ?
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मंत्री काही महत्त्वाच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने मनसेला जवळ करून शिंदे सेनेवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आहे, असे राजकीय सूत्रांचे मत आहे. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
भाजप-मनसे युतीचा मुंबई महापालिकेवर फोकस ?
मुंबई महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून भाजपाने मनसेला सोबत घेण्याचा विचार केला आहे. भाजपाला मनसेच्या मराठी मतदारांमध्ये प्रभाव वाढवायचा आहे, तर मनसेला राजकीय अस्तित्व टिकवायचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
(हेही वाचा- Justice Gavai यांचे हेलिकॉप्टर मेळघाटात भरकटले; काही काळाने सुखरूप लँडिंग)
अमित ठाकरे विधान परिषदेत जाणार ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अमित ठाकरे यांचा पराभव आणि मनसेला अपयश आल्यानंतर पक्षाची राजकीय दिशा अधांतरी होती. अशा परिस्थितीत भाजपाच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषद आमदार करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे मनसेची नाराजी दूर करून त्यांना महायुतीमध्ये सामील करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
भाजपाची महापालिका रणनिती – ‘मुंबईवर भगवा झेंडा’ ?
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, देशात भाजपचे सरकार, राज्यात भाजपचा प्रभाव आणि मुंबई महापालिकेतही भाजपला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळेच, शिंदे गटावर दबाव आणत, मनसेला सोबत घेत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा भाजपचा स्पष्ट मानस दिसत आहे. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
(हेही वाचा- Champions Trophy : पाकची पुन्हा नाचक्की, गद्दाफी स्टेडिअममधील सदोष फ्लडलाईट्समुळे रचिल रवींद्रला दुखापत)
राजकीय समीकरणे बदलणार ?
या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप-मनसे युती होणार का ? शिंदे सेनेला बाजूला सारण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होणार का ? आणि ठाकरे गट या राजकीय हालचालींना कसे प्रत्युत्तर देणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (CM Fadnavis Raj Thackeray Meet)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community