दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या ५ डॉक्टरांचे वैद्यकीय मंडळ तयार करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर २३ एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. निखिल टंडन वैद्यकीय मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांना तिहार जेलच्या डीजींच्या पत्रावरून अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एम्समधून आधीच नियुक्त करण्यात आले होते. (CM Kejriwal)
(हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; प्रचंड गर्दीत Muralidhar Mohol यांचा अर्ज दाखल)
सोमवार २२ एप्रिलपासून अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांना दररोज दुपारच्या जेवणापूर्वी २ युनिट कमी डोस आणि रात्रीच्या जेवणापूर्वी २ युनिट इन्सुलिन दिले जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी अद्याप वैद्यकीय मंडळाची भेट घेतलेली नाही. लवकरच मेडिकल बोर्डाची टीम तिहार तुरुंगात जाऊन केजरीवालांची तपासणी करू शकते. (CM Kejriwal)
(हेही वाचा –उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून Varsha Gaikwad यांची उमेदवारी जाहीर, याचसाठी केला होता नाराजी नाट्याचा प्रयोग)
तिहार तुरुंगातील डॉक्टर अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांची शुगर लेव्हल दररोज तपासतात आणि निरीक्षण करतात. न्यायालयाच्या आदेशानुसार सीएम केजरीवाल यांना फक्त घरचे जेवण दिले जात आहे. सध्या अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांची प्रकृती ठीक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community