मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील महिलांसाठी (CM ladki Bahin) आणखी एक गुड न्यूज दिली आहे. ताई तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. योजनेसाठी राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा –Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd: कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार, ३० जण बेपत्ता! पाहा व्हिडीओ)
शिंदे म्हणाले, ”ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणाला किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे.” (CM ladki Bahin)
(हेही वाचा –Crime News : सातारा हादरलं! प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले)
”या योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आणि नावनोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. ज्या भगिनी 31 ला नोंदणी करतील, त्यांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे.” असे शिंदे म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. (CM ladki Bahin)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community