‘प्रश्नम’ या संस्थेने त्यांचा त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये देशातील १३ मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अव्वल ठरवले आहे. याची मनसेने मात्र खिल्ली उडवली. आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर १ यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असेच मुख्यमंत्र्यांचे आहे, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
सरकारने जनतेचा अंत पाहू नये!
‘प्रश्नम’ या संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. त्यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, नंबर एक असण्यासाठी काम करावे लागते, दीड वर्षात काय केले?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, तसेच जनतेला वेठीस धरू नये. तुमच्यातील वाद बाजूला ठेवून जनतेच्या मागण्यांकडे लक्ष द्या. रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असताना जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही?, असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला.
अजूनही निर्बंध शिथिल नाही. सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 15, 2021
पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोड ची मिसळ "जगात भारी"पुण्याची मस्तानी"जगात भारी" चितळें ची बाकरवडी " जगात भारी" तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री "जगात भारी"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 15, 2021
(हेही वाचा : न्यायालयीन कामासाठी आता ए-४ आकाराच्याही पेपरला परवानगी!)
लसींचे दोन डोस घेतलेल्यांना सूट द्या!
ज्यांच्या दोन लसीचे डोस पूर्ण झाले असतील, ते त्यांना सूट द्यायला पाहिजे, लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामे केली? शाळेच्या फीचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखोरी करत आहे, असे देशपांडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community