मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ९ महिन्यांमध्ये ६२०० रुग्णांना ५० कोटींची मदत!

120

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत 6200 रुग्णांना एकूण 50 कोटी 55 लाख रुपयांची मदत दिली आहे.

( हेही वाचा : रामनवमीच्या दिवशी तब्बल ७ राज्यांत उसळल्या दंगली; कोणती आहेत ‘ती’ राज्ये?)

जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 10 कोटी 27 लाख, आणि मार्च 2023 मध्ये 11 कोटी 95 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत तात्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.