हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण; CM Nayab Singh Saini यांची घोषणा

109
हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण; CM Nayab Singh Saini यांची घोषणा
हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण; CM Nayab Singh Saini यांची घोषणा

हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (CM Nayab Singh Saini) यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी (Agnivir) 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. सीएम सैनी म्हणाले की, आमचे सरकार हरियाणातील अग्निवीरांसाठी पोलिस कॉन्स्टेबल, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड, जेल वॉर्डन आणि एसपीओच्या थेट भरतीमध्ये राज्य सरकारमध्ये 10 टक्के आरक्षण देणार आहोत.

(हेही वाचा –vaghankhe: शिवरायांची वाघनखे मुंबईत दाखल! साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भव्य सोहळा होणार)

या अग्निवीर कर्मचाऱ्यांना गट ड आणि क मधील सरकारी पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयात 3 वर्षांची सूट देण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. पहिल्या बॅचच्या बाबतीत ही वयोमर्यादा 5 वर्षे असेल. सरकार गट-क मधील नागरी पदांवर थेट भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 5 टक्के आणि गट ड मध्ये एक टक्के आरक्षण देईल. जर कोणत्याही औद्योगिक युनिटने दरमहा 30 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला, तर हरियाणा सरकार त्या औद्योगिक युनिटला वर्षाला 60 हजार रुपये सबसिडी देईल. यासह राज्य सरकारने अग्निवीर जवानांसाठी गट क पदांच्या भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. (CM Nayab Singh Saini)

(हेही वाचा –vaghankhe: शिवरायांची वाघनखे मुंबईत दाखल! साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भव्य सोहळा होणार)

सीएम सैनी म्हणाले की, हरियाणा सरकार अग्निवीर जवानांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी मदत करेल. यासाठी ज्या अग्निवीरांना आपले काम करायचे आहे, त्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. (CM Nayab Singh Saini)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.