Maharashtra Assembly session: राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

131

पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. परंतु ठाकरे सरकारने ५ पैसे देखील कमी केले नाही. त्यामुळे मोदींनी केलेल्या आवाहनानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात भाषणादरम्यान केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

केंद्राने पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईड ड्युटी कमी केली . त्याच धर्तीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी कऱण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील सामान्य जनतेला होणार आहे. त्यामुळे येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय लवकरच घेण्यात येईल.

दरम्यान, मे महिन्यात केंद्र सरकारने इंधनाच्या किमतीतून उत्पादन शुल्क कमी केले. त्यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. मे महिन्यात म्हणजेच २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयानंतर आता राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होणार असल्याचे त्यांनी सभागृहात भाषणादरम्यान सांगितले.

(हेही वाचा – संघर्षमय आठवणींना उजाळा देतांना मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर)

शिंदे-भाजप सरकारचा विजय

शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकार बहुमत चाचणीत देखील यशस्वी होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीत देखील शिंदे-भाजप सरकारने विजय संपादन केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.