Alert! पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

132

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित हानी व मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच सबंधित पालक सचिवांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – परशुराम घाटातील वाहतूक अजूनही बंदच; वाहनाच्या लांबच लांब रांगा)

यासोबतच त्यांनी एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी, तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे, लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, असेही आदेश शिंदेंनी दिले आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्मंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील परिस्थितीवर देखील काळजीपूर्वक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी देखील गाठली असून खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.