नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून तर्क-वितर्क लावले जात आहेत. या चर्चांनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पवारांना दिलेली ही अनौपचारिक भेट होती, अशाही बातम्याही प्रकाशित करण्यात आल्यात. मात्र, आता या बातमीवर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
(हेही वाचा – “दाऊद, मुंबई बॉम्बस्फोटासह ‘या’ संबंधित खटल्यांवर निर्णय घेण्यास ठाकरे सरकार अयशस्वी”)
काय केला शिंदेंनी खुलासा?
एकनाथ शिंदेंनी ट्विट करत असे म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्वीट करत कोणत्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो देखील शेअर केला आहे.
या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे… pic.twitter.com/vMAMIcTjfL
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे सांगितले होते. या भेटीगाठींची सुरुवात त्यांनी पवारांपासून केली असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले. पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील ज्येष्ठ नेते आहेत. सत्तासंघर्षामध्ये जरी ते विरोधी बाकावर असले तरी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने शिंदेंनी ही भेट घेतली असल्याची चर्चाही सोशल मीडियावर होत असल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community