CM Pushkar Dhami : औरंगजेबपूर बनले शिवाजी नगर ; १५ गावांची नावे बदलण्याची उत्तराखंड सरकारची घोषणा

57
CM Pushkar Dhami : औरंगजेबपूर बनले शिवाजी नगर ; १५ गावांची नावे बदलण्याची उत्तराखंड सरकारची घोषणा
CM Pushkar Dhami : औरंगजेबपूर बनले शिवाजी नगर ; १५ गावांची नावे बदलण्याची उत्तराखंड सरकारची घोषणा

उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमधील अनेक ठिकाणांची नावेही बदलली जात आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी (CM Pushkar Dhami) यांनी ईदच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी १५ ठिकाणांची नावे बदलण्याची घोषणा केली आहे. स्थानिक लोकांच्या भावना आणि वारसा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. (CM Pushkar Dhami)

हेही वाचा-Maharashtra Weather : IMD चा 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट ; पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचे !

महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या थडग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंड सरकारने १५ इस्लामिक ठिकाणांची नावे हिंदू देवतांच्या नावांवर बदलण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी म्हणाले, “लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतासाठी आपले बलिदान देणाऱ्या आणि भारताची संस्कृती आणि अभिमान जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या नावावर या ठिकाणांची नावे ठेवली जातील. लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून हे केले गेले आहे.” (CM Pushkar Dhami)

हेही वाचा- Rakesh Sharma यांच्यानंतर आता ‘हा’ भारतीय अंतराळात झेपावणार

उत्तराखंडमधील भगवानपूर ब्लॉकमधील औरंगजेबपूरचे नाव बदलून शिवाजी नगर, बहादराबाद ब्लॉकमधील गाझिवलीचे नाव बदलून आर्य नगर, चंदपूरचे ज्योती नगर, मोहनपूरचे खानपूरचे नाव बदलून कृष्णपूर असे नामकरण करण्यात आले आहे. (CM Pushkar Dhami)

हेही वाचा- Donald Trump Tariff War : अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के आयात शुल्क, भारत काय उत्तर देणार?

या ठिकाणांव्यतिरिक्त, रशनापूर आणि अकबरपूर फाजलपूर यांचे नाव विजयनगर असे ठेवण्यात आले आहे. तसेच डेहराडून महापालिकेत मियांवालाचे नाव बदलून रामजीवाला, विकास नगर ब्लॉकमध्ये पीरवालाचे नाव बदलून केसरी नगर, चांदपूर खुर्दचे पृथ्वीराज नगर, सहसपूर ब्लॉकमध्ये अब्दुल्लापूरचे नाव बदलून दक्षिण नगर असे करण्यात आले आहे. नैनीताल नवाबी रोडचे नाव बदलून अटल मार्ग करण्यात आले आहे. उधम सिंह नगरच्या सुलतानपूर पट्टीच्या नगरपरिषदेचे नाव कौशल्या केले आहे. (CM Pushkar Dhami)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.