१ मे पासून राज्यात १८ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण सुरु करत आहोत, मात्र जसा लसीचा साठा उपलब्ध होईल, तसे लसीकरण करण्यात येईल, पण म्हणून लसीकरण केंद्रात गर्दी करू नका, त्यासाठी कोवीन ऍपवर नोंदणी करा, यावेळी हे अँप बिघडू नये म्हणून केंद्राला विनंती केली असून प्रत्येक राज्यांना स्वतंत्र अँप बनवण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. सध्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ३ लाख लसींचा साठा आपल्याकडे आहे. गोंधळ उडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका, लसीकरण करतो तिथे शिस्त पाळा, जशी लस उपलब्ध होईल, तशी दिली जाईल. हे लसीकरण कोरोना पसरण्याचे माध्यम होणार नाही, याची खबरदारी घ्या. मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे त्यासाठी २५ जणांची उपस्थितीचे बंधन पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना केले.
एक रकमी एका चेकने डोस खरेदी करण्याची राज्याची तयारी
महाराष्ट्रातील 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी आणि एका चेकने खरेदी करण्याची तयारी राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी त्यांनी राज्याला लसीचा साठा उपलब्ध करुन द्या, अशी विनंती केंद्राला केली.
तिसऱ्या लाटेची तयारी सुरु !
कोरोनाची तिसरी लाट येणार, असे तज्ज्ञ म्हणत आहेत, तरीही त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही अशी तयारी आपण करत आहोत, जरी ही तिसरी लाट आली तरी अर्थचक्र थांबता कामा नये, म्हणून मी उद्योजक आणि कामगार संघटना यांच्याशी चर्चा केली असून तिसऱ्या लाटेत उद्योग बंद न करता याला कसे सामोरे जाणार याची तयारी करायला सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
१२ कोटी लसीचे डोस लागणार!
जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले, लसीच्या बाबतीत आपण एक नंबर आहोत. पण दुर्दैवाने आपण कोरोनाबाधित रुग्ण संख्येतही पुढे आहोत. राज्यात 18 ते 44 वयोगटातील सुमारे 6 कोटी नागरिक आहेत, त्यासाठी 12 कोटी लसीचे डोसेस लागणार आहेत. यासाठी जी काय किंमत असेल ती एक रकमी चेक देऊन घेण्याची आपण तयारी ठेवली आहे. आपल्याला मे महिन्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी 18 लाख डोस मिळणार आहे. जी काही लस उत्पादित होते त्यातील 50 टक्के लस केंद्र सरकार घेणार आहेत, तरीही सरकार परस्पर लस खरेदी करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले
- राज्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्व वीरांना नम्रपणे अभिवादन करतो
- कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
- गेल्यावर्षी लॉकडाऊन होता यावर्षीही काही फरक नाही.
- हे काय दृष्टचक्र मागे लागले आहे कळत नाही.
- 2010 चा मला 1 मे आठवतो. लता दिदी यांनी ‘बहु असोत सुंदर…’ हे गाणं गात तो काळ जागा केला होता.
- आता याच्याहून काही कडक करण्याची वेळ येणार नाही
- बंधनाचा नेमका काय फायदा झाला
- तर ज्या पटीने आणि वेगाने रुग्ण वाढ होत राहिली, तर आज 9 ते 10 लाख ऍक्टिव्ह रुग्ण असते
- आज ती रुग्णसंख्या आपण 6 ते साडे सहा लाखपर्यंत स्थिरावून ठेवली आहोत
- आज संयम दाखवला नसता, तर कल्पना करणे ही कठीण होतं.
- आपली रोजी मंदावेल असे मी म्हणालो होतो, पण रोटी मी थांबू देणार नाही
- राज्याचे हित होत असेल तर मी कुणाचेही अनुकरण करायला तयार आहे
- आज आपण चाचण्या देखील वाढवत आहोत
- मागच्या जूनमध्ये 2 हजार 665 होती, आता साडेपाच हजार कोविड केअर सेंटर केली आहे.
- गेल्यावर्षी 2 प्रयोग शाळा, आज राज्यात 609 प्रयोग शाळा
- गेल्यावर्षी 3,744 व्हेंटिलेटर होते ,आता 11 हजार 713 व्हेंटिलेटर राज्यात आहेत
- राज्यात सध्या 28 हजार 937 आयसीयू बेड्स आहेत
- आपण बाहेरून आणणाऱ्या ऑक्सिजनचे पैसे देतो आणि वाहतुकीची पैसे वेळेत देत आहोत
- आज रुग्णसंख्या स्थिरावली आहे
- आता अचानक रेमडेसिवीरची मागणी वाढत आहेत
- आपली मागणी 50 हजारची आहे
- दरदिवशी 43 हजारची सोय करण्यात येईल, असे केंद्राने सांगितले आहे
- पण आज आपल्याला 35 हजार इंजेक्शन आपल्याला मिळत आहेत.
- रुग्णवाढ झाली तर मोठी अडचण येऊ शकते
- अनावश्यक रेमडेसिवीरचा वापर आपण करू नये
- गेल्या काही दिवसात राज्यात जी काही हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट तयार करा, असे मी सांगितले आहे
- येत्या काही दिवसात हे सर्व प्लांट सुरू होतील
- तिसरी लाट आली तर आपल्याला ऑक्सिजन अपुरा पडणार नाही, ही सोय आपण करतो आहोत
- जिथे जिथे गॅस ऑक्सिजन प्लांट आहे त्याच्या बाजूला आपण कोविड सेंटर उभारत आहोत
- कारण लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करता येते पण गॅस ऑक्सिजन वाहून नेता येत नाही
- राज्य सरकार पावणे तीनशे प्लांट स्व खर्चाने लावत आहे
- गेल्या काही दिवसांत दुर्घटना घडल्या आहेत
- अशावेळी जीवावर उदार होऊन काहीजण काम करत आहेत
- जम्बो कोविड सेंटरची आपण उभारणी केली आहेत त्याचे ऑडिट करा
- नवीन उभारता ज्या ज्या काही गोष्टी घडू शकतील त्या टाळण्याचा आटोक्यात प्रयत्न करा
- आपल्या आता एक कुटूंब म्हणून आणि टीम म्हणून काम करायला हवे
- काही गोष्टी आपल्याला वाटल्या तर त्या सुधारण्यासाठी वरिष्ठांना लगेच कळवा
- साडेपाच हजार कोटींचे आपण पॅकेज जाहीर केले
- शिवभोजन थाळी गेले वर्ष पाच रुपये केली पुढचे दोन महिने मोफत देत आहोत
- 15 लाखाहून अधिक नागरिकांना आपण लाभ दिला
- पूर्ण वर्षभर 4 कोटी लोकांना याचा लाभ झाला
- 7 कोटी लाभार्थी यांना मोफत तांदूळ गहू वाटप आपण केले
- 9 लाख कामगारांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत
- आपण कुठेही गप्प बसलेलो नाहीत
- काही कमी पडू देत नाही आणि पडू देणारही नाही
- आज इतर देशात लाटांवर लाट येत आहेत
- आपण आता तिसऱ्या लाटांच्या संकटांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहोत
- तिसऱ्या लाटेत अर्थ चक्र थांबणार नाही याची काळजी घेणार
- तिसरी लाट आपण थोपवू
- आपल्यानंतर आजूबाजूच्या राज्यांनी देखील लॉकडाऊन लावले आहे
- गेल्या जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले
- लसीच्या बाबतीत आपण एक नंबर आहोत. पण दुर्दैवाने आपण आकड्यामध्ये देखील पुढे आहोत
- 18 ते 44 मध्ये सुमारे 6 कोटी नागरिक आहेत
- 12 कोटी डोसेस लागणार आहेत
- यासाठी जी काय किंमत असेल ती एक रकमी एक चेक देऊन घेण्याची आपण तयारी आपण ठेवली आहे
- आपल्याला मे महिन्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी 18 लाख डोस मिळणार आहे.
- जी काही लस उत्पादित होते त्यातील 50 टक्के लस केंद्र सरकार घेणार आहेत.
- आपण ब्रिटनसारख करणार आहोत
- उद्यापासून आपण 18 ते 44 नागरिकांचे लसीकरण जशी लस मिळेल तसे करणार आहोत
- सर्व राज्यांना त्यांची त्यांची अँप तयार करण्याची परवानगी द्या असे पंतप्रधान यांना सुचवले आहे
- लसीचा पुरवठा मर्यादित आहे. जून आणि जुलैमध्ये मुबलक साठा मिळेल
- हे आपले सरकार आहे. लसीकरणाची जबाबदारी पूर्णपणे पेलायला राज्य सरकार तयार आहे
- गोधळ उडू नये म्हणून गर्दी करू नका
- लसीकरण करतो तिथे शिस्त पाळा
- जशी लस उपलब्ध होईल तशी दिली जाईल
- 18 पासून सर्वांचे लसीकरण सरकार करणार आहे
- आमची तयारी पूर्ण आहे आम्हाला जास्तीत जास्त लस पुरवठा करा
- आमची एक रकमी चेकने पैसे द्यायची तयारी आहे
- येत्या महिन्यात लग्न समारंभ खूप आहेत
- 25 जणांची मर्यादा कायम असणार आहे
- आपला नाईलाज आहे.
- सर्व कार्यक्रमाना बंधन घातली आहेत
- उत्साहाला आपण मुरड घातली पाहिजे
- तुमच्यासाठी जे जे करायचे ते हे सरकार करेल