माझ्या आग्रहाने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री! फडणवीसांच्या आरोपाचा पवारांनी केला खुलासा

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल, असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

87

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, माझ्या आग्रहाखातर त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या शब्दामुळे मुख्यमंत्रीपद स्वीकारले, असे वक्तव्य केले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली, असा पलटवार केला. त्याचा खुलासा चक्क शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत केला.

फडणवीस सत्ता नसेल तर अस्वस्थ होतात 

देवेंद्र फडणवीस हे सत्ता नसेल तर अस्वस्थ होतात. त्या अस्वस्थेतून ते टीका करतात. फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी आक्षेप घेऊ नये. 5 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. तुम्ही केलेले आरोप मला योग्य वाटत नाही, असेही शरद पवार म्हणाले. सत्ता जाणार, सरकार पडणार की येणारच, पण येणारच काही जमेना – राजकीय आकसना या चौकश्या सुरू आहेत, असेही पडळकर म्हणाले.

(हेही वाचा : मलिकांच्या आरोपातील फ्लेचर पटेल, लेडी डॉन कोण? वाचा…)

धाडीतून काही निष्पन्न होईल वाटत नाही

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल, असे मला वाटत नाही. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोक छापेमारीसाठी गेले होते. त्याचे वागणे वाईट होते असे नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागले नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आले. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असे पाच -पाच दिवस येऊन राहणे किती योग्य आहे?, असा सवाल पवारांनी केला.

फडणवीस बोलल्यावर तपास यंत्रणा कामाला का लागतात?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.