मराठा आरक्षण आणि कोरोनाची लढाई संयमाने जिंका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केला आहे. त्याचा अनादर केंद्र आणि राष्ट्रपती यांनी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  

कोरोनाचे संकट सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर जो निर्णय दिला तो दुर्दैवी आहे, अशाही वातावरणात मराठा समाजाने जो संयम दाखवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. तरीही काही जण मराठा समाजाची माथी भडकवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो कि, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सगळे संपले नाही, त्यातूनही मार्ग काढणार आहे, तूर्तास आपण सर्व जण कोरोना आणि आरक्षणाची लढाई संयमाने जिंकू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी, ५ एप्रिल रोजी जनतेशी थेट संवाद साधताना केले.

मराठा समाजाने संयम दाखवला! 

मराठा आरक्षणावर ज्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली, त्यांनीच सर्वोच्च  न्यायालयात बाजू मांडली, पण आज पदरी निराशा आली. त्यानंतरही मराठा समाजाने कुठेही थयथयाट केलेला नाही. सरकार आपल्यासाठी लढत आहे. अजूनही लढाई संपलेली नाही. गायकवाड कमिशनच्या शिफारशी देखील न्यायालयाने बाजूला ठवलेल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी या विषयाचा गाढा अभ्यास केला आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा : …तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू! ठाकरे सरकारने केंद्रावर ढकलली जबाबदारी)

केंद्र आणि राष्ट्रपतींनी न्यायालयाचा अनादर करू नये!

सर्वोच्च न्यायालयाने संगितले हा निर्णय केंद्राचा आणि राष्ट्रपतीचा आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीना हात जोडून विनंती करतो आता तीच हिंमत दाखवा, जी ३७० कलम रद्द करताना दाखवला होता. मराठा समाज हा सहनशील आहे. आता या समाजाला न्याय देण्याचा निर्णय केंद्राने घ्यावा. उद्या मी अधिकृत पत्र त्यांना देणार आहे. माझी त्यांना भेटण्याची देखील तयारी आहे. केंद्राच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. त्याचा अनादर केंद्र आणि राष्ट्रपती करणार नाहीत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तिसरी लाट येणार आहे!

आता कोरोना रुग्ण वाढ थोडी थोडी खाली आली आहे. पण अजूनही आपल्याला गाफिलपणा परवडणार नाही. काही जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण वाढत आहेत ही धोक्याची घंटा आहे. राज्यात रुग्ण वाढ मंदावत आहे. देशामध्ये तिसरी लाट येत आहे, त्यामुळे सावध रहा, असे केंद्राच्या विभागाने सागितले आहे. 6 लाख 41 हजार 900 इतकी रुग्ण वाढ आपण कालपर्यत थोपवली आहे. जिथे आवश्यक असेल तिथे आरोग्य सुविधा आपण वाढवत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करत आहोत!

18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिकांना लस द्यायची आहे. जस जसा लस पुरवठा होईल तसे आपण लसीकरण करत आहोत. 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण उत्पादित करतो. आम्हाला 200 मेट्रिक टन आणखी ऑक्सिजन हवा असे पत्र आपण केंद्राला लिहिलं आहे. आपण तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. आपण किमान 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन काही दिवसात करू, ती तयारी करायला हवी. मिशन ऑक्सिजन हे नाव दिले आहे. त्यादृष्टीने आपण हालचाल करत आहोत. रेमडेसिवीरमध्ये हळुवारपणे वाढ होत आहे. जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरला आपण झूम कॉलवर मार्गदर्शन करत आहोत. आपण सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. तिसरी लाट जर आली तर तिचा घातक दुष्परिणाम आपण आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण जी लढाई लढतो त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले आहे

 • आता रुग्ण वाढ थोडी थोडी खाली आली आहे
 • पण अजूनही आपल्याला गाफिलपणा परवडणार नाही
 • काही जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण वाढत आहेत ही धोक्याची घंटा आहे
 • राज्यात रुग्ण वाढ मंदावत आहे
 • देशामध्ये तिसरी लाट येते सावध रहा, असे केंद्राच्या विभागाने सागितले आहे
 • 6 लाख 41 हजार 900 इतकी रुग्ण वाढ आपण कालपर्यत थोपवली आहे
 • जिथे आवश्यक असेल तिथे आरोग्य सुविधा आपण वाढवत आहोत
 • 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिकांना लस द्यायची आहे
 • जस जसा लस पुरवठा होईल तसे आपण लसीकरण करत आहोत
 • 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण उत्पादित करतो
 • आम्हाला 200 मेट्रिक टन आणखी ऑक्सिजन हवा असे पत्र आपण केंद्राला लिहिलं आहे
 • आपण तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे
 • आपण किमान 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन काही दिवसात करू
 • ती तयारी करायला हवी
 • मिशन ऑक्सिजन हे नाव दिले आहे
 • त्यादृष्टीने आपण हालचाल करत आहोत
 • रेमडेसीवीरमध्ये हळुवारपणे वाढ होत आहे
 • जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरला आपण झूम कॉलवर मार्गदर्शन करत होत
 • आपण सर्वांना सोबत घेऊन जात आहोत
 • तिसरी लाट जर आली तर तिचा घातक दुष्परिणाम आपण आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही
 • आज एक सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो निराशाजनक आहे
 • काही वर्षांपूर्वी सर्व पक्षांनी विधिमंडळात एक मुखी मराठा समजाला आरक्षण देण्याचा कायदा तयार केल
 • पण आज हा दुर्दैवी निकाल आला आहे
 • आज जे निकालपत्र आले त्यावर काम सुरू आहे
 • ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयात बाजू मांडली त्यांनी बाजू मांडली
 • पण आज पदरी निराशा आली.
 • मराठा समाजाने कुठेही थयथयाट केलेला नाही
 • सरकार आपल्यासाठी लढत आहे. अजूनही लढाई संपलेली नाही
 • गायकवाड कमिशनच्या शिफारशी देखील त्यांनी बाजूला ठवलेल्या आहेत
 • अशोकरावांनी याचा गाढा अभ्यास केला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने संगितले हा निर्णय केंद्राचा आणि राष्ट्रपतीचा आहे
 • पंतप्रधान आणि राष्ट्रपतीना हात जोडून विनंती करतो आता तीच हिंमत दाखवा
 • मराठा समाज हा सहनशील आहे. आता या समाजाला न्याय देण्याचा निर्णय केंद्राने घ्यावा
 • उद्या मी अधिकृत पत्र त्यांना देणार आहे
 • माझी त्यांना भेटण्याची देखील तयारी आहे
 • केंद्राच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे
 • त्याचा अनादर केंद्र आणि राष्ट्रपती करणार नाहीत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here