राज्यपालांची राज्याकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी चक्क ‘ती’ फेटाळली!

महिला सुरक्षा हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याच विषयावर ४ दिवसांचे विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी, अशी सूचना केली.

107

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी साकीनाका येथील पाशवी बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थितीत केला आणि त्यासाठी २ दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी न स्वीकारता चक्क मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘महिला सुरक्षा हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याच विषयावर ४ दिवसांचे विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी, अशी सूचना केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री पत्रात? 

  • विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते.
  • सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना मा. राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.
  • उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. त्या ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय?
  • उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे.
  • बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला.
  • उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे.
  • बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते.

New Project 24 1

New Project 25 1

  • उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचे एनसीआरबीचे म्हणणे आहे. पण यावर तेथे विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी तेथील भाजपने केल्याचे दिसत नाही.
  • जम्मू-कश्मीरमधील कश्मिरी पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे नेहमीच शिकार व्हावे लागले. पण जम्मू-कश्मीरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी गांभीर्याने चर्चा केली.
  • उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. तेथेही महिलांवरील अत्याचारांचा आलेख चढता आहे.
  • देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत.
  • हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत.
  • म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदचे ४ दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी करावी.

(हेही वाचा : राज्यपालांनी महिला सुरक्षेसाठी लिहिलेल्या पत्राला सरकारकडून केराची टोपली?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.