आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा!

महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचे कल्पिता पिंपळेंशी बोलणे करून दिले.

89

ताई, तुमचे धैर्य पाहून कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला.

महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी, ३ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचे कल्पिता पिंपळेंशी बोलणे करून दिले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांच्यापाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांना फसवले, ‘ते’ नगरसेवक जनआशीर्वाद यात्रेआधीच सेनेत!)

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

‘जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवले…तु्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.