‘दादा जिथे तुम्ही आहात, तिथे माझी…’ भर सोहळ्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं काय झालं वाचा

172

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफुस असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याच्या कारभाराबाबत शिवसेना नाराज असल्याचे बोलले जात आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या वादावर पडदा टाकला आहे. जीएसटी भवनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मित्र पक्षांवर स्तुती सुमनं उधळत, ठाकरे सरकामध्ये सारं काही आलबेल असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक करताना, तुम्ही जिथं असाल तिथं मी येण्याची आवश्यकता नाही, असं देखील म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत मुख्यमंत्र्यांच्या मनाच्या मोठेपणाला दाद दिली आहे.

(हेही वाचाः शिवसेना-राष्ट्रवादीत कलह? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)

सगळे जण एक आहोत

जीएसटी भवनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फन्सीद्वारे उपस्थिती लावली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित दादा जिथे तुम्ही आहात, तिथे मी पुन्हा येण्याची आवश्यकता नाही. सरकारमधील मतभेदांच्या बातम्या या चुकीच्या आणि विपर्यास निर्माण करणा-या असल्याचे म्हटले आहे. सरकारमधील सगळे जण एकजुटीने काम करत राहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील एकीचे बळ दाखवून दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारमध्ये रुसव्या-फुगव्याचं वातावरण तयार केलं जात आहे, पण तसं काही नाही. माझा माझ्या सहका-यांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्वजण अनेक संकटांवर मात करत राज्याच्या भल्यासाठी उत्तमरित्या काम करत आहोत. त्यामुळे सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

(हेही वाचाः ‘मी सुरू केलं, यांनी रखडवलं! त्यामुळे…’ फडणवीसांचा खोचक टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.