शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची भेट घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. जे गेले आहेत त्यांच्यासाठी काय कमी केलं होतं, सरकारमध्ये असताना आतापर्यंत सगळी महत्वाची खाती देण्यात आली. त्यामुळे या सगळ्याचा आता फक्त वीट येऊन चालणार नाही तर वीट हाणावी सुद्धा लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंजखोर आमदारांना इशारा केला आहे.
वीट हाणावी लागेल
महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत नगरविकास खातं मुख्यमंत्री सोडून इतर कोणाला मिळालं होतं का, ते मी देऊन टाकलं. संजय राठोड यांच्यावर अलीकडच्या काळात वाईट आरोप झाल्यामुळे मी त्यांचं वनखातं घेतलं. पण इतर सर्व खाती मी वाटून टाकली. मग अजून काय करायला हवं होतं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मला या सर्व गोष्टींचा वीट आला आहे. पण आता वीट येऊन उपयोग नाही तर ती वीट आता हाणावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
(हेही वाचाः ‘जे माझे नव्हतेच त्यांच्यासाठी मला वाईट का वाटावं?’, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांबाबत संताप)
उरते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा
आता ते विठ्ठल आणि बडव्यांबाबत बोलत आहेत. पण स्वतःचा मुलगा खासदार आणि माझा मुलगा होता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे का?, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उरते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. त्यामुळे ही जी विष्ठा आहे ती तरंगत जाऊद्या, निष्ठावंत आपल्यासोबत कायम राहतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community