मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेआधीच हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टोला लगावला आहे. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे; असले भोंगेधारी, पुंगीधारी आम्ही खूप पाहिले आहेत. महाराष्ट्राची जनता आता सगळ्यांना चांगलीच ओळखून आहे. या सगळ्याकडे एक मनोरंजन म्हणून पाहिले पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
कधी मराठीचा कधी हिंदुत्वाचा खेळ
हिंदुत्वाची भूमिका घेत, वेगळा पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. असे विचारल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात, हे अनुभवलेले आहे. कधी मराठीचा कधी हिंदुत्वाचा खेळ. डोंबा-यांचा मी अपमान करु इच्छित नाही, पण महाराष्ट्राचे लोक असा खेळ करत आहेत. असे म्हणत, त्यांनी सध्या फुकट करमणूक सुरु असल्याचे म्हणत त्याचा आनंद घ्यावा असे म्हटले आहे.
( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर; मनसेच्या तक्रार अर्जामुळे पोलिसांसमोर पेच )
हिंदुत्वाचा डंका पिटून काहीजण माकडचाळे करतात
आपल्या देशातील जनता नासमज नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्हाला डंका वाजवावा लागत नाही. तुम्हाला का सारखं सांगावं लागतं. तुम्हाला झेंडे बदलावे लागतात. कधी या रंगाचा कधी त्या रंगाचा. आम्ही कधीच झेंडा बदललेला नाही. काही गोष्टी आता बोलणार नाही. 14 तारीखला बोलणार आहे. हिंदुत्वाचा डंका पिटून काहीजण माकडचाळे करत आहेत. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
Join Our WhatsApp Community