एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. आज 22 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते वर्षावर परतणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ.अजित देसाई आणि डॉ.शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दुस-यांदा वर्क फ्राॅम होम
10 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता डिस्चार्ज दिल्यानंतर डॅाक्टरांच्या घरुनच काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा वर्क फ्राॅम होम करणार आहेत. याआधीही टाळेबंदी असताना मुख्यमंत्र्यांनी वर्क फ्राॅम होम केले होते.
…म्हणून करण्यात आली शस्त्रक्रिया
गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्यात आला होता. मात्र ही सर्व्हायकल आणि स्पायनल कॉड शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
(हेही वाचा : देशाच्या अर्थमंत्री ठरल्या सर्वांत प्रभावशाली महिला! )
Join Our WhatsApp Community