शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शनिवारी दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. त्यानंतर लगेचच गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतली. यावेळील मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे हे देखील उपस्थित होते. गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा देणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अखेर आता ही बैठक पार पडली असून, त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पवार कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा, तसेच बेजबाबदार पोलिस अधिका-यांवर कारवाी करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
(हेही वाचाः ‘इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट’, पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारलाच फटकारले)
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान केला. तसेच त्यांनी पोलिस यंत्रणेच्या कारभाराबाबत देखील गृहमंत्र्यांकडे संताप देखील व्यक्त केला. कालच्या घटनेची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी संजय पांडे यांना केला आहे. तसेच बेजबाबदार पोलिस अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
पवार कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ
शुक्रवारी झालेल्या प्रकारानंतर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांचा जागता पहारा पवारांच्या निवासस्थानी तैनात करण्याचे आदेश यावेळी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
(हेही वाचाः मी शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जीवाला धोका आहे! सदावर्तेंच्या पत्नीचा आक्रोश)
Join Our WhatsApp Community