सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी आपल्यावर राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांचा दबाव होता, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीक गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्याला वाझेंना सेवेत घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या, असं परमबीर सिंह यांनी ईडी समोर सांगितले आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही परमबीर सिंह यांनी आरोप केला आहे. यानंतर एकच खळबळ उडवून दिली आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वाझेची शिफारस अनिल देशमुखांनी केली? आदित्य ठाकरेंनी केली? किंवा उद्धव ठाकरेंनी केली? हा प्रश्न आता समोर आला आहे.
(हेही वाचा – किती तोडा, किती फोडा… भाजपचाच महापौर बसणार!)
परमबीर सिंह यांनी वाझेंना सेवेत परत का घेतले असे ईडीने विचारले असता, ते म्हणाले, ‘एक समिती स्थापन केली होती. निलंबित असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाची पाहणी करून त्यांना सेवेत घ्यायचे की नाही? याबाबत निर्णय घ्यायचा होता. त्याच यादीत सचिन वाझेचं नाव होतं. बैठक सुरू होती त्यावेळी अनिल देशमुखांचा दबावा होता की सचिन वाझेंना परत सेवेत घ्यावे. तसेच त्यांना मुंबईच्या गुन्हे शाखेत चांगली पोस्टींग द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दबाव होता”, असे गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले आहेत.