#Live: विधानसभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह!

 • सर्व प्रश्नाला मला याच भाषणात उत्तर देता येणार नाही.
 • मला अचानक असा भास झाला, मी नटसम्राट बघत होतो.
 • या क्षेत्रात कलागुणाला वाव मिळत नाही.
 • सुधीर भाऊ तुमच्यातला कलाकार तुम्ही मारू नका.
 • तुमच्यातील कलाकार जिवंत ठेवा.
 • कधी कधी ती उचंबळून येते.
 • राज्यपालांनी निःपक्षपाती पणे सरकारची भूमिका समोर ठेवली.
 •  राज्यपाल मराठीत बोलले ही एक अभिमानाची बाब आहे.
 • कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत ८० कोटी लोकांना धान्य दिले.
 • आठ महिन्यांत हे गरीब श्रीमंत झाले का?
 •  आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतो. आणि तीही भरलेली देतो रिकामी नाही.
 •  आम्ही रिकामी थाळी वाजवायला देत नाही.
 •  भरलेली थाळी आणि रिकामी थाळी यात फरक आहे.
 • चला आपण केंद्राकडे जाऊ, कर्नाटक सरकार कशी सक्ती लादते ती मोडून काढू.
 •  आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ, पण अजूनही केंद्राकडून मातृभूमीला तिष्ठत ठेवलं आहे.
 •  छत्रपती नसते तर दिल्लीत बसले तरी असते का?
 • मराठी माती आणि मराठी माता विसरू शकत नाही.
 •  स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्र दोन वेळेला दिले आहे.
 •  भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्राला आहे. मग भारतरत्न का दिला जात नाही?
 • आम्ही संभाजीनगरचे नामांतर नक्की करू.
 •  आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही.
 • ये मेरे महाराष्ट्र के लोगो फूस लो पाणी, जो झूट बोलते है उनकी खतम करो बेईमानी.
 • देवेंद्रजी तुम्ही म्हणता गमक नसेल, तर यमक.
 • आम्ही यमक नाही तर आमच्यात काम करण्याची धमक देखील आहे.
 • नारायण भंडारी मोठा होणार की नाही तुम्ही लहानपणीची गोष्ट सांगितली.
 • तुमची ज्यांनी लिहिली त्यांनीच मला ही कथा लिहून दिली आहे.
 • हा व्हायरस आहे हा म्हणतो मी पुन्हा येईन पुन्हा येईन.
 •  दुर्दैवाने तो व्हायरस परत आला. पण सरकार खबरदारी घेत आहे.
 • देशात जम्बो रुग्णालय हे आम्ही केले आहे.
 • शर्जिल उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
 • बाळासाहेब हिंदुत्वासाठी उभे राहीले तेव्हा तुम्ही कुठे होतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here