2 महिन्यांच्या आजारपणानंतर मुख्यमंत्री आले जनतेसमोर! केली ‘ही’ घोषणा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा करताना ‘शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत’, असे मुख्यमंत्री उद्धव ठकरे म्हणाले. 2 महिन्यांच्या आजारपणानंतर मुख्यमंत्री जनतेसमोर आले.

मुंबईकर म्हटले की, मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत? त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री ठकरे म्हणाले.

(हेही वाचा कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण?)

मुंबईसाठी शिवसेनेने आपले सर्वस्व दिले

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना भेट दिली. मुंबईतील 500 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून जवळपास 16 लाखांहून अधिक कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे. मुंबई आणि शिवसेना हे नाते वेगळेच आहे. मुंबईकरांना शिवसेनेला भरभरुन दिले आहे. मुंबईसाठी शिवसेनेने आपले सर्वस्व दिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळीही ते स्वत: मुंबईतील समस्येकडे जातीने लक्ष देत होते. कोरोना काळातही मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. कोरोनाच्या काळात स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा फायदा कोरोना काळातही लोकांना झाला, घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची माहिती नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here