मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजरच! भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटने चर्चेला उधाण 

136

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी सूप वाजले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थिती रहातील का, अशी चर्चा सुरु होती. सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थिती राहतीलच, असे ठामपणे सांगितले जात होते, प्रत्यक्षात मुख्यमंत्री शेवटपर्यंत अधिवेशनाला आलेच नाहीत. त्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलेले टीकात्मक ट्विट सध्या बरेच चर्चिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तंदुरुस्त असूनही लोकसभेत जात नाही. एखाद्याच्या आजाराचे राजकारण करण्याची नवीन संस्कृति भाजपने निर्माण केली आहे. ही संस्कृती यापूर्वी नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरेच आजारी आहेत, हे सर्वांना माहित आहे. जनता त्यावर काही बोलत नाही, जनतेने समजून घेतले आहे. जरी मुख्यमंत्री घरी असले तरी ते राज्याचा कारभार पाहत आहेत. ऑनलाईन बैठका घेत आहेत. निर्णय घेत आहेत. शेवटी शरीर म्हटले कि आजार होतातच. उद्या भातखळकर कोरोनामुळे आजार पडले आणि पंधरा दिवस घराबाहेर पडू शकले नाही, तर त्यांच्या मतदार संघातील जनता असाच विचार करणार का?
– आमदार मनीषा कायंदे, प्रवक्ता, शिवसेना

अतुल भातखळकर यांनी काय केले ट्विट?   

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमालाही जेव्हा मुख्यंमत्री गैरहजर राहिले होते, तेव्हा मुख्यमंत्री अधिवेशनात तरी उपस्थितीत राहणार का, या प्रश्नाने माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भांडावून सोडले होते. त्यावेळी पवार यांनी, मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थितीत राहतील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?, अशा शब्दांत ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण अधिवेशन मुख्यमंत्री विधान भवनाकडे फिरकलेच नाही. आता त्यावर भाजपचे नेते टीकाटिपण्णी करत आहेत. भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर मार्मिक ट्विट केले, भातखळकर म्हणाले, विधिमंडळ बनाउंगातेरे घर के सामने
अधिवेशन भराउंगा
तेरे घर के सामने…

भातखळकर झाले ट्रॉल! 

या ट्विटवर अतुल भातखळकर चांगलेच ट्रॉल झाले. नेटकऱ्यांनी भातखळकरांना ‘ते निलंबित आमदार आहेत’, अशी आठवण करून दिली.

तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरी संसदेच्या अधिवेशनात कुठे उपस्थित होते, अशी विचारणा केली.

https://twitter.com/MahajanDhanesh/status/1475977690146607109?s=20

तर एकाने भातखळकर यांनी काव्य पंक्ती करून रामदास आठवले बनण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही दिला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.