मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवर काय म्हणाले संजय राऊत? जाणून घ्या…

118

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, अशी चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री शेवटपर्यंत आलेच नाहीत. त्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा विषय चर्चेला आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. पण त्यांना काही पथ्य आहेत. मात्र, तरीही ते अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते, असे राऊत यांनी सांगितले.

राज्याचे अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. विधानसभेचे कामकाज अत्यंत सुरळीत पार पडले. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने टोले देत टोले घेत, दोन देत चार घेत अशा प्रकारे अधिवेशन झाले, असे संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावरच ठाम! काय म्हणतात नेते?)

राजकारणात प्रत्येकाला अत्तराची गरज आहे

उत्तर प्रदेशात पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड सापडले. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पार्टीवर निशाना साधला आहे. उत्तर प्रदेशात तापलेल्या या अत्तराच्या राजकारणावरूनही राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकते. एवढा आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाऱ्याकडे घबाड मिळाले. महागडे अत्तर मिळाल्याने प्रत्येकाला वाटत आपण अत्तर विकावे. आता हे अत्तर कुणाचे नक्की? इतके दिवस कोण अंगाला चोपडून राजकारण करत होते? याच्यावर वास सुरू आहे. पण राजकारणात प्रत्येकाला अत्तराची गरज आहे. कुणी कितीही टीका केली तरी अशा अत्तराच्या सुंगधाशिवाय कोणीच राजकारण करू शकत नाही, असेही राऊत म्हणाले.

हमाम में सब नंगे है

राजकारणात सर्व मोठे लोक अशा प्रकारचे महागडे अत्तर घरात ठेवत असतात. मात्र दुसऱ्यांच्या घरात मिळाल्यावर त्याची चर्चा होते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये 180 कोटींचे पेपर परफ्यूम मिळाले आहे. कलरफूल. आता त्यावर राजकारण होत आहे. गोव्यात काय चालले आहे? उत्तर प्रदेशात काय चालणार? पंजाबात काय होणार? याच परफ्यूमचा वापर करून तुम्ही निवडणुका लढणार आहात आणि जिंकणार आहात. राजकारणाच्या हमाम में सब नंगे है. मग तुम्ही कितीही अत्तर लावा. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.