मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर मिळालेल्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरुन मिळालेल्या या धमकीत अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य केल्या नाही तर ईडी, सीबीआय, एनआयएची चौकशी मागे लावू, अशी धमकी यात देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांना लिहिले पत्र!
हा धमकीचा मेसेज आल्यानंतर नार्वेकर यांनी याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मेसेजमधील मजकुराचाही उल्लेख केला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना टार्गेट केले जात असल्याची तक्रारदेखील केली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र, यातील मागण्या मान्य न केल्यास ईडी, सीबीआय किंवा एनआयएची चौकशी मागे लावू, अशी धमकी यात दिली गेली आहे.
(हेही वाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या आमदार निधीतील पहिले काम शिवतीर्थावर! दिव्यांनी उजळणार परिसर!)
क्राईम ब्रांचच्या खंडणी पथकाकडून चौकशी
शिवसेना नेते, सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या धमकीच्या प्रकरणाचा क्राईम ब्रांचकडून तपास सुरू आहे. क्राईम ब्रांचची खंडणी विरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर या हे प्रकरण तपासासाठी क्राईम ब्रांचकडे सोपवले आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा ईडी, सीबीआय आणि एनआयए मागे लावू अशा स्वरूपाच्या धमक्या नार्वेकर यांच्या व्हाट्सएप वर देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community