अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडला वर्षा बंगला

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे ‘मला मुख्यमंत्री पदाचा लोभ नाही, मी आजचा वर्षा बंगला सोडून मातोश्रीत परतत आहे’, असे सागंत उद्धव ठाकरे हे बुधवारी, २२ जून रोजी रात्री 9.39 वाजता वर्षा बंगला सोडून अखेरीस मातोश्रीच्या दिशेने निघाले.

वर्षा बाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी 

शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मजबूत बंडामुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ अर्ध्याहून अधिक कमी झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ‘आपल्याला मुख्यमंत्री पदाचा लोभ नाही, संध्याकाळी आपण वर्षा बंगला सोडून मातोश्रीत जात आहे’, असे म्हटले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस  नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्यावरून साहित्याची बांधाबांध सुरु झाली. त्यावेळी वर्षा बंगल्याच्या बाहेर काही संख्येने शिवसैनिक जमले होते आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत घोषणाबाजी करू लागले.  उद्धव ठाकरे यांच्या नावाने शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही यावेळी वर्षा बंगल्यावरून निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी येथे येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरले आणि त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले.

(हेही वाचा एकनाथ शिंदेंसोबत 35 आमदारांची बंडखोरी, महाविकास आघाडी सरकारचे 101 जीआर!)

कोरोना झाला असताना उद्धव ठाकरेंभोवती गर्दी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे, तसे त्यांनी स्वतःहून सांगितले आहे. तरीही त्यांना वर्षा बंगल्यावर उपरोक्त पक्षांचे प्रमुख नेत्यांनी कशा भेटी घेतल्या, अशी चर्चा सुरु झाली. तसेच वर्षा बंगल्याच्या बाहेरही मुख्यमंत्री ठाकरे बाहेर आलेले दिसले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण होऊनही ते भेटीगाठी का करत करत आहे, असा प्रश्न विचारला जात होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here