गुढीपाडव्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा तडाखा सुरु केला. त्यापाठोपाठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेण्यास सुरुवात केल्यावर आता यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. मागील १५ दिवसांत त्यांच्यावर झालेल्या टिकेला उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. तसेच भाजप आणि मनसेवर टीका करणार आहेत. मात्र या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सवाल जवाब रंगणार आहे. कारण १५ मे रोजी फडणवीस हे मुंबईत सभा घेऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार आहेत.
१४ मे रोजी या मुद्यावर उद्धव ठाकरे बोलणार
उद्धव ठाकरे त्यांच्यावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांचा मुद्दा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काढला, प्रचाराच्यावेळी ‘मुख्यमंत्री फडणवीस होणार’, असे म्हटले जात होते, तेव्हा ते गप्प का होते?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनीही हाच धागा पकडून शिवसेनेने हिंदूंविरोधी पक्षांच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व संपले आहे. तसेच बाबरी ढाचा पडला तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता, असेही फडणवीस यांनी म्हटले.
(हेही वाचा आरक्षण असो वा नसो भाजप २७ टक्के उमेदवारी ओबीसींना देणार! फडणवीसांची घोषणा)
१५ मे रोजी फडणवीस देणार उत्तर
उपरोक्त टीकेमुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनीही ‘एकदाचे काय ते होऊ दे’, असे सांगत १४ मे रोजी सभेत करार जवाब देणार, अशी घोषणा केली आहे. मात्र त्याच वेळी १५ मे रोजी दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतच सभा होणार आहे, त्यामुळे फडणवीस हे उद्धव ठाकरे यांनी काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community