बाबरीनंतर सीमोल्लंघन केले असते तर आज सेनेचा पंतप्रधान असता!

बाबरी मशीद पडली, तेव्हा सगळे पळाले होते, त्यावेळी ‘गर्व से कहो हम हिंदू है’, अशी घोषणा शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. त्याच वेळी जर शिवसेनेने महाराष्ट्राची सीमा ओलांडली असती, तर आज कदाचित शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, कारण तेव्हा शिवसेनेची देशभर लाट होती, पण त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ‘तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो’, असे म्हटले. पण त्यांनी विश्वासघात केला. जिंकल्यावर वापरा आणि फेकून द्या, असे धोरण ठेवले, असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढा…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी दृक्श्राव्य माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज एनडीएमध्ये किती राहिले, सगळ्यांना सोबत घेऊन जिंकेल आणि एकटेच वर जाऊन बसले. आज जर गप्प बसलो, तर पुन्हा गुलामगिरीची परिस्थितीत येईल. हे मोडायचे असेल तर तिथे शिवसैनिकासारखाच मर्द पाहिजे, म्हणून बँकेची निवडणूक असो कि ग्राम पंचायतीची निवडणूक असो, ती जिंकायचीच या इर्षेने ती लढा, शंभर टक्के जिंकणारच असे तुम्हा म्हणता, निकाल लागल्यावर दांडी गुल झालेली असते, मग सांगतात गद्दारी झाली, मतदानापर्यंत निवडून येणार होतात ना, हा फाजील आत्मविश्वास सोडून द्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कान टोचले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य पद्धतेने शिवसैनिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे शिवसेना सचिव सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले, प्रस्तावना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत हे स्क्रीनवर दिसत होते.

स्थानिक निवडणुका गांभीर्याने घ्या… 

नगरपंचायत निवडणुकीत आपण चौथ्या क्रमांकावर आहोत, पण आजवर आपण तेवढ्या संख्येने जागा लढवल्या नव्हत्या, तरीही नगरसेवक जास्त संख्येने निवडून आलो आहोत. आजवर आपण या निवडणूक गांभीर्याने घेतल्या नव्हत्या, मीही त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मूठभर शिवसैनिक राहिले, तरी त्यांच्या मुठीत तलवार देऊन मी लढेन. गद्दारी कुठे होत नाही, पण दुर्लक्ष होता कामा नये, मी मुख्यमंत्री झालो, पण सहकार क्षेत्रात आपल्या कुणाची पत्रे येत नाही. सहकारात आपण किती काम करतोय?, असे सांगत सहकारातही शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here