बापरे! मुख्यमंत्र्यांनी सांगितला साथीचा नवा रोग… म्हणाले, याचं निदान होत नाही

213

मेट्रो-2अ आणि मेट्रो-7 या दोन मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. मेट्रो प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई जुंपलेली असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

हल्ली राजकारणामध्ये जे केलं ते आम्हीच केलं म्हणण्याची एक नवी साथ आलेली आहे. याचं निदान अजून झालेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

(हेही वाचाः मनसेच्या मेळाव्यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा)

अशा रुग्णांकडे लक्ष देऊ नका

राजकारणामध्ये सध्या एक नवीन साथ आली आहे. त्या रोगाचं अजून निदान झालेलं नाही. तुम्ही काही केलं नाही, जे केलं ते आम्हीचं केलं, त्यातूनही नवीन काही केलं असेल तर तो भ्रष्टाचार केला आहे, असं म्हणण्याची ही एक नवीन साथ सध्या आली आहे. यामध्ये तळमळ, मळमळ अशी सगळी लक्षणं एकत्र दिसत आहेत. त्यामुळे नेमकं काय औषध द्यावं, असा प्रश्न डॉक्टरांना देखील पडला आहे. पण अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः अजित दादा म्हणतात, उद्धवजी बोलत असताना गुदगुल्या करतात)

मुंबईकरांनी पाहिलं नाही, लक्षातही ठेवलं आहे

कौरवांचे चाळे बघू न शकणारा धृतराष्ट्र नाही, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आम्ही काम केलं आहे, मुंबईकरांनी पाहिलंय. रातोरात झाडांची कत्तल कशी केली हे मुंबईकरांनी नुसतं पाहिलंच नाही, तर लक्षात देखील ठेवलं आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर आरोप केला आहे. पण आम्ही असं काम करणार नाही, पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

या दोन्ही मेट्रो मार्गिकांचं काम मी सुरू केलं होतं, त्या कामाला चांगलाच वेगही आला होता, हे जनतेला चांगलंच माहीत आहे. काही कारणांमुळे ठाकरे सरकारच्या काळात हे काम रखडलं, पण आता ते सुरू होत आहे. त्यामुळे आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा, मेट्रो-3 चा प्रकल्प निकाली काढा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केलं होतं.

(हेही वाचाः ‘मी सुरू केलं, यांनी रखडवलं! त्यामुळे…’ फडणवीसांचा खोचक टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.