‘ते लवकरच परत येतील’, एकनाथ शिंदेंबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर आता शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत असताना दुसरीकडे त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांची नाराजी समजून घेण्यासाठी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र पाठक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. पण आता त्यांच्या या नाराजीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे लवकरच आपल्यात परत येतील, असा विश्वासही त्यांनी शिवसेना आमदार-खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत दुसरे बंड, 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती)

भाजपसोबत का जायचं?

भाजपसोबत सत्ता स्थापन केली तर मी शिवसेनेत राहायला तयार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार-खासदारांच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले आहे. तुमचं काही नाही, माझं काही नाही तर मग जायचं कशाला? आता सांगत आहेत की भाजपसोबत चला, भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला होता का?, मग आता पुन्हा भाजपसोबत कसं जायचं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला आहे.

(हेही वाचाः ‘बाळासाहेबांच्या जवळचा लाईटही हलतोय’, किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर)

मी एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न करत असून, ते आपलं नक्कीच ऐकतील आणि लवकरच आपल्यात असतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here